चंद्रपूर प्रतिनिधी :
ब्रह्मपुरी तालुक्यातील सोंदरी येथे १३ वर्षीय मानसिकदृष्ट्या विकलांग अल्पवयीन मुलीवर एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
"A stain on humanity! Torture on a mentally disabled girl" आरोपी सोंदरी गावचा रहिवासी असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 64(2)(F), 64(2)(F), 65(1), दिव्यांगजन अधिकार अधिनियम कलम 92(D) तसेच ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी वडसा येथील मानसिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी तिचा माग काढत होता. गेल्या दीड वर्षांपासून आरोपी गावातील शाळा परिसरात पीडितेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. आरोपीला ताब्यात घेऊन बुधवारी (दि. १२) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
मानवतेला कलंकित करणाऱ्या या घटनेमुळे दिव्यांग व मानसिकदृष्ट्या विकलांग मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर अशा मुली समाजात सुरक्षित नसतील, तर ते समाजासाठी लज्जास्पद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल खोबरागडे करत आहेत.
0 comments:
Post a Comment