राजुरा १४ सप्टेंबर :-
जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे १२ सप्टेंबर २०२५ रोजी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार, संपूर्णत: अभियान सन्मान पुरस्कार व जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
Dhanraj Duryodhan honored with District Teacher Award.जिल्हा शिक्षक पुरस्कारांमध्ये जिल्ह्यातील १५ शिक्षक, एक माध्यमिक शिक्षक व एक कला शिक्षक असे एकूण १७ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार विशेष अतिथी आमदार सुधाकर अडबाले व आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. असाच जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२५ - २६ करिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भुरकुंडा बुद्रुक पंचायत समिती राजुरा येथील विज्ञान विषय शिक्षक धनराज रघुनाथ दुर्योधन यांना मिळाला. त्यांनी विद्यार्थ्यासाठी राबविलेली मिनी बचत बँक, शालेय विद्यार्थ्यासाठी बालवाचनालय , विनोबा अँप मध्ये विषयाच्या अनुषंगाने सहभाग घेऊन बक्षीसे प्राप्त केली आहेत.त्यांनी कोरोना काळात राज्यस्तरावर विविध स्पर्धेत अनेक बक्षीसे प्राप्त केली आहेत. तसेच ग्लोबल टीचर रोल मॉडेल अवॉर्ड व महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. तेंव्हा त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन शिक्षण विभाग चंद्रपूर कडून त्यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिना साळुंखे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी केळकर, शिक्षणाधिकारी ( माध्य.) राजेश पातळे उपस्थित होते.
जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचायत समिती राजुराचे संवर्ग विकास अधिकारी (उ श्रे) डॉ.बी. ए. रेजिवाड, गटशिक्षणाधिकारी मंगला तोडे, शिक्षण विस्तार अधिकारी विशाल शिंपी, केंद्रप्रमुख कल्पना श्रीकोंडावार , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल ठावरी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला आत्राम आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment