राजुरा: घरी कुणीही नसल्याची संधी साधून विष प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. बाबाजी वासुदेव टोंगे (५५) रा.चिंचोली (खुर्द) ता.राजुरा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. sucide
यंदा खरीप हंगामातील सततचा ओला दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून निराश झालेल्या बाबाजी टोंगे यांनी घरी कुणीही नसल्याची संधी साधून रविवारी कीटकनाशक विष प्राशन केले. ही घटना कुटुंबियांना माहित होताच त्यांना उपचारार्थ तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री ९ वाजता रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून खरिपातील पिकांची स्थिती अत्यंत बिकट आहे.त्यामुळे खासगी बँकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते नेहमी असायचे. या निराशेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.या घटनेमुळे चिंचोली (खुर्द) येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment