भद्रावती जावेद शेख : नागपूर-चंद्रपूर महामार्गासह शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा या आशयाचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने नगर परिषदेला देण्यात आली. यावरती येत्या ७ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा याद्वारे देण्यात आला.
Control stray animals, if no action is taken within 7 days, agitation will be launched: CPI demands through statement
नगरपरिषद क्षेत्रातील नागपूर-चंद्रपूर महामार्गसह शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरती मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी झिंगुजी वार्डातील वाल्मीक चौकात मोकाट जनावराने रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीवर हमला करून जखमी केले होते. तसेच नागपूर-चंद्रपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन मोकाट जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली. घंटा (कचरा) गाडीवरील ध्वनिक्षेपनाद्वारे सूचना करताना दि. १३ जुलै २०२५ पासून मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकण्यात येईल तसेच जनावर मालकांवर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु त्यानुसार नगर परिषदेने कारवाई सुरू केली नाही.नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी भाकपाचे जिल्हा सरचिटणीस कॉ. राजू गैनवार आणि कार्यकर्त्यांनी
निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपरिषदेला सध्या स्वतःचा कोंडवाडाच नसल्याने मोकाट जनावरांना कोंडण्याचा प्रश्नच येत नाही. चुकीने ध्वनीक्षेपणाद्वारे मोकाट जनावरांना कोंडवाड्यात जमा करण्यात येईल अशी सूचना करण्यात आली. ती आता थांबविण्यात आली. विजयकुमार जांभुळकर उपमुख्यधिकारी, नगर परिषद भद्रावती
मोकाट जनावरांना कोंडवाड्यात जमा करण्यात येत आहे.अशी जाहिरात नगर परिषदेच्या कचरा गाडीवरील ध्वनिक्षेपणाद्वारे केली जात होती. आता नगर परिषदेला स्वतःचा कोडवाडाच नाही. अशी माहिती खुद्द मुख्याधिकारी यांनी दिली.ही जनतेची दिशाभूल आहे. दिशाभूल करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये. विजय वानखेडे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका भाजपा महामंत्री
0 comments:
Post a Comment