Ads

तलवारीसह दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीस अटक

चंद्रपूर, 24 सप्टेंबर –
शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी अवैध हत्यारासह दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीस अटक केली आहे. दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन स्टीलच्या धारदार तलवारी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
An accused who created terror with a sword was arrested
अप. क्र. 779/2025 कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचे नाव धीरज बबलू यादव (वय 32, रा. लखमापूर, ता. जि. चंद्रपूर) असे आहे. तर दुसरा आरोपी राहुल (मो. 7499187204, रा. लखमापूर, ता. जि. चंद्रपूर) हा फरार असून पोलीस त्याचा पाठलाग करत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी धीरज यादव हा वडगाव ते आंबेडकर सभागृह परिसरात स्टीलच्या धारदार तलवारी घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे पोलिसांना कळताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासमक्ष त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 3,000 रुपयांचा मुद्देमाल (तीन स्टीलच्या तलवारी) जप्त करण्यात आला.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय संतोष निभोरकर, पीएसआय सर्वेश बेलसरे, पोहवा जयसिंह, तसेच सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे व दिनेश अराडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

पोलीस ठाणे रामनगर येथे आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment