Ads

मनसे महिला सेनेला बल्लारपूरात नवे बळ

बल्लारपूर : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या बल्लारपूर तालुकाध्यक्ष कल्पना पोतर्लावार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होत विविध क्षेत्रातील शेकडो महिलांनी मनसेत प्रवेश करून पक्षाच्या बळकटीस हातभार लावला.
MNS Mahila Sena gets new strength in Ballarpur
*नव्याने पक्षाचा झेंडा देऊन सन्मानित करण्यात आले*

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार उपस्थित होते यावेळी जिल्हासचिव किशोर मडगुलवार, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, पोंभुर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम, चंद्रपूर तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी कल्पना पोतर्लावार यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला. आपल्या मनोगतात बोलताना त्या म्हणाल्या, “महिला सक्षमीकरणासाठी, त्यांच्या हक्कासाठी व समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच पर्याय आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी पक्षात प्रवेश केला याचा मला अभिमान आहे.” यावेळी महिलाना साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सोबतच मनसेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बालमवार यांनी मार्गदर्शन करताना राजसाहेबांचे हाथ बळकट करण्यासाठी आपण आज मोठ्या संख्येने मनसे परीवारामध्ये सहभागी झालात ज्या विश्वासानी तुम्ही मनसेचा झेंडा हाती घेतले त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही असा भावनिक आवाहन या प्रसंगी केले..
या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांनी परीश्रम घेतले असून महिलांच्या पक्ष प्रवेशामुळे मनसे महिला सेनेची ताकद बल्लारपूर तालुक्यात आणखी वाढली असून आगामी काळात या ताकदीचे रूपांतर समाजहिताच्या चळवळीत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रविण शेवते, राजु देवांगन, रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, मनविसे पोंभूर्णा तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, फिरोज पठान, आशिष चटपल्लीवार निखील दुर्ग चिंन्दु दुर्गे तसेच मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment