सावली - शेतात फवारणीचे औषध खरेदी करून पोंभुर्णा येथून पेंढरी मक्ता कडे दुचाकीने येत असतांना जुनासूर्ला हद्दीत ट्रकने धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाल्याने चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
Two people killed, one seriously injured in truck collision
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून मोटरसायकलने गोंडपिपरी - खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला हद्दीत ट्रकने उडविले. या अपघातात सारंग गंडाटे ( वय २६) रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे ( वय २३) रा. पेंढरी मक्ता याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. लंकेश समर्थ रा. मुंडाळा हा जखमी असून चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment