चंद्रपूर | 28 सप्टेंबर 2025
जिल्हा पुनर्वसन कार्यालय, प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील सहायक महसूल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना (दि. 28 सप्टेंबर) ₹30,000 ची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो चंद्रपूरने रंगेहात पकडले. Anti Corrupation trap
Assistant Revenue Officer at District Rehabilitation Office caught red-handed while accepting a bribe of ₹30,000
तक्रारदार यांच्या मुलीची कनिष्ठ अभियंता पदावर प्रकल्पग्रस्त आरक्षणातून निवड झाल्यानंतर प्रमाणपत्राच्या पुनर्पडताळणीसाठी आरोपीने एकूण ₹2 लाख लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ₹1 लाख जुलैमध्ये स्वीकारून उर्वरित ₹30,000 मागणी केली.
तक्रारदाराने ACB कडे धाव घेतल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करून आरोपीने लाचेची मागणी व स्वीकार करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. आरोपीने कार्यालयात ₹30,000 स्वीकारताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपास सुरू असून ही कारवाई पोलीस अधीक्षक सागर कवडे व अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार पडली.
0 comments:
Post a Comment