मुल - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आयोजित ‘भाऊंचा गरबा महोत्सवा’ साठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची प्रमुख उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे. मुल येथील तालुका क्रीडा संकुलात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.*
Actress Prajakta Mali will come for Bhauncha Garba festival
स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती मुल यांच्या वतीने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होत असलेल्या या महोत्सवाला दररोज मोठ्या प्रमाणता गर्दी होत आहे. याअंतर्गत भव्य समूह गरबा दांडिया स्पर्धा आयोजित केलेली आहे. दि. १ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ ते रात्री १० या कालावधीत नवरात्राच्या कार्यक्रमांना अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता मुल तालुक्यातील बेंबाळ येथे देवी जागरणाला त्यांची उपस्थिती असेल. त्यानंतर मुल येथील तालुका क्रीडा संकुलात सायंकाळी ८.३० ते रात्री १० या कालावधीत गरबा महोत्सवात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण आहे. आकर्षक रोषणाई, उत्कृष्ट सजावट व पारंपरिक तालावर होणारा गरबा, यामुळे संपूर्ण मुल परिसरात उत्साह निर्माण झाला आहे.
0 comments:
Post a Comment