चंद्रपूर | प्रतिनिधी:-
चंद्रपूर येथील कृष्ण नगर परिसरातील Model Convent School मधील दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या कारभाराविरोधात गंभीर तक्रारी करत थेट जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. दिनांक ७ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांनी लेखी निवेदन सादर करून शाळेकडून होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, शाळेतील काही समस्या व गैरव्यवहारांविषयी आवाज उठवल्यानंतर त्यांना प्रॅक्टिकल परीक्षेतील गुण कमी करण्याची धमकी देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारा Send-off कार्यक्रम देखील अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Fraud in the Name of CBSE? Model Convent School Embroiled in Controversy Once Again!
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी कार्यालयाने तक्रारीची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या शाळेविरोधात यापूर्वीही शिक्षण विभागाच्या चौकशीत काही अनियमितता आढळल्याची माहिती समोर आली आहे. राज्य मंडळाची मान्यता असताना CBSE अभ्यासक्रमाच्या नावाखाली प्रवेश घेतला जात असल्याचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष आशिष सुनील पिल्ले यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत, विद्यार्थ्यांना धमकावणे हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे म्हटले आहे. संबंधित शाळेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच चौकशीस विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी प्रशासनाकडून लवकरच ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष आता पुढील निर्णयाकडे लागले आहे.
0 comments:
Post a Comment