चंद्रपूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या सत्र २०२५-२६ चा निकाल आज (दि.२) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता करिअर लॉन्चरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे. Janata Career Launcher Upholds Its Excellent Tradition of Success in the 12th Grade.
जनता करिअर लॉन्चर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.
जनता करिअर लॉन्चरमधून कु. साक्षी सुरेश पिंपळशेंडे, शुभम रंजीत परचाके, दिव्या सुनील खामनकर, साहिल दिलीप खिरटकर, होमी पितांबर भोंगळे, श्रुती प्रमोद आगलावे, दिक्षांत कांबळे, संस्कृती भगत, तिशा अमोल हेपट, गौरव विजय एकरे आदी विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत.
यामधे ८०% पेक्षा अधिक गुण घेणारे ४२ विद्यार्थी, ८५ ते ९०% दरम्यान गुण घेणारे ४७, ८० ते ८५% दरम्यान गुण घेणारे ५८ विद्यार्थी, तर ७० ते ८०% दरम्यान २४ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जीवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे, उपप्राचार्य सौ. विद्या शिंदे, डॉ. के.सी.पाटिल, डॉ. दीपिका संतोषवार, जनता करिअर लाँचरचे व्यवस्थापक विष्णू ठाकरे, प्रा. नितीन कुकडे, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. प्रविण चटप, प्रा. महेश यार्दी, प्रा. निलेश तुराणकर, प्रा. सचिन झाडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 comments:
Post a Comment