Ads

“सीजेपी हा युवांसाठी नव्हे, तर मोदीविरोधासाठीचा राजकीय प्रयोग” – मुनगंटीवारांचा हल्लाबोल“

चंद्रपूर |  प्रतिनिधी:-
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)' Cockroach Janata Party' (CJP) वर जोरदार टीका करताना हा पक्ष “युवकांच्या नावावर उभा केलेला राजकीय प्रयोग” असल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, सीजेपीचा उद्देश युवकांच्या समस्या सोडवणे नसून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण निर्माण करणे हा आहे. असे राजकीय प्रयोग देशात अस्थिरता निर्माण करतात आणि दीर्घकाळ यशस्वी होत नाहीत.“CJP is not for the youth, but a political experiment to oppose Modi” – Mungantiwar’s attack
शनिवारी शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण उपलब्धींचा आढावा घेतला. यावेळी बेरोजगारी, पेपर लीक आणि सीजेपीच्या स्थापनेबाबत विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.
पेपर लीकबाबत भूमिका
नीट पेपर लीकसारख्या घटना चिंताजनक असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करत आहे. पूर्वीच्या सरकारांच्या काळातही अशा घटना घडत आल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारच्या कामगिरीचा आढावा
मुनगंटीवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्राधान्य दिले. सरकारच्या धोरणांच्या केंद्रस्थानी गरीब, शेतकरी, युवा आणि महिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढील कामगिरी अधोरेखित केली—
२५ कोटी नागरिक गरिबी रेषेबाहेर
४ कोटींहून अधिक पक्की घरे
६० कोटी नागरिकांना आयुष्मान भारतचा लाभ
३ कोटींहून अधिक महिला ‘लखपती दीदी’ योजनेतून सशक्त
५७ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मुद्रा कर्ज
१२ कोटींहून अधिक शौचालयांची निर्मिती
याशिवाय डिजिटल व्यवहार, निर्यात आणि सामाजिक सुरक्षा कवचातही मोठी वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला.
गडचिरोलीत विकासाची नवी दिशा
मुनगंटीवार म्हणाले की, पूर्वी नक्षलवादासाठी ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता विकास आणि प्रगतीचा केंद्रबिंदू बनत आहे, जे सरकारच्या धोरणांचे यश दर्शवते.
इंधन दरवाढीवर स्पष्टीकरण
इंधनाच्या वाढत्या किंमतींबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय घटकांमुळे दरवाढ झाली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही अशाच परिस्थितीत पेट्रोल दर वाढल्याचे त्यांनी उदाहरण दिले.
“विकसित भारताकडे वाटचाल”
गेल्या १२ वर्षांचा कालावधी हा केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडविण्याची प्रेरणादायी यात्रा असल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले. देश आज आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनला असून जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment