Ads

अमृत रस्ते विकास योजनेत सुमठाणा–तेलवासा मार्गाचा समावेश करण्याची मागणी

भद्रावती, जावेद शेख प्रतिनिधी,
भद्रावती तालुक्यातील सुमठाणा–तेलवासा ईजिमा क्र. २३ या रस्त्याचा अमृत रस्ते विकास योजना २०२५–२०४७ अंतर्गत प्रमुख जिल्हा मार्गामध्ये दर्जोन्नती करून समावेश करण्यात यावा, यासाठी भाजपचे ग्रामीण महामंत्री तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय रामदास वानखेडे यांनी वरोरा–भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांना निवेदन सादर केले आहे.
Demand to include Sumthana-Telvasa road in Amrit Raste Vikas Yojana
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित रस्ता इतर जिल्हा मार्ग (ईजिमा) क्रमांक २३ असून त्यास राज्य मार्गामध्ये दर्जोन्नती देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषद चंद्रपूरच्या सर्वसाधारण सभेनेही या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

मात्र, इतर काही जिल्हा व ग्रामीण मार्गांचा थेट राज्य मार्गामध्ये समावेश झाल्याने या रस्त्याचा विकास योजनेत समावेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई येथून तातडीने मंजुरी मिळवून हा मार्ग अमृत रस्ते विकास योजना २०२५–२०४७ मध्ये समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मार्गाच्या विकासामुळे सुमठाणा, तेलवासा व परिसरातील गावांतील नागरिक, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित, जलद आणि सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे आमदारांनी याबाबत सकारात्मक पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती विजय वानखेडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment