Ads

कोरपण्यातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; चोरीची पल्सर जप्त, आरोपी जेरबंद.

चंद्रपूर | प्रतिनिधी
कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), चंद्रपूर यांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली सुमारे ₹40 हजार किंमतीची Bajaj Pulsar 125 मोटारसायकल जप्त करण्यात आली.
Crime of motorcycle theft exposed in Korpanyatil!  Bold action against local crime branch;  Stolen Pulsar seized, accused arrested
दिनांक 30 जून 2026 रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोरपणा परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी गणेश राजू दर्शनवार (वय 26, रा. कोरपणा, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून कोरपणा पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील Bajaj Pulsar 125 जप्त करण्यात आली.
सदर आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कोरपणा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
उघडकीस आलेला गुन्हा :पोलीस स्टेशन : कोरपणा अपराध क्रमांक : 266/2026
कलम : 303(2), भारतीय न्याय संहिता (BNS) – मोटारसायकल चोरी

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग गडचांदूर पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment