Ads

आलिजा शेखची राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिर

भद्रावती : जावेद शेख प्रतिनिधी,
आयुध निर्माणी वसाहत चांदा येथील मूळची रहिवासी व मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या अवघ्या ७ वर्षीय आलिजा शेख हिने राष्ट्रीय स्तरावरील किकबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे १७ ते २१ जून दरम्यान झालेल्या नॅशनल सब-ज्युनियर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये तिने अंडर-१८ किलो गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
Alija Shekhchi gold performance in national kickboxing competition

या दमदार कामगिरीच्या जोरावर आलिजाची व्हेनिस (इटली) येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ साठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विलेपार्ले येथील एसव्हीकेएम शाळेची विद्यार्थिनी असलेल्या आलिजाला 'योधा फायटिंग अँड फिटनेस अकॅडमी'चे प्रशिक्षक विशाल सिंह यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्यपूर्ण व कठोर सरावामुळे तिने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविण्याचा मान मिळवला आहे. तिचे वडील शादाब शेख व आई डॉ.अल्मास शेख यांनी सांगितले की, टीव्हीवर ऑलिम्पिक पाहिल्यानंतर आलिजाला किकबॉक्सिंगची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर तिने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय विजेतेपदापर्यंत मजल मारली.

आलिजाच्या यशाबद्दल तिचे आजोबा तथा सेवानिवृत्त संरक्षण अधिकारी इसराईल शेख यांनी आनंद व्यक्त करत, "अवघ्या सातव्या वर्षी देशासाठी सुवर्णपदक मिळवणे ही अभिमानाची बाब असून, इटलीतही ती तिरंगा फडकवेल, असा पूर्ण विश्वास आहे," असे सांगितले.

तसेच सेवानिवृत्त लेखापरीक्षक अधिकारी कहीर कुरेशी यांनीही आलिजाचे कौतुक करत, "नागपूर ते व्हेनिसपर्यंतचा हा प्रवास तिच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा परिणाम आहे. ती जागतिक स्तरावरही भारताचे नाव उज्ज्वल करेल," असा विश्वास व्यक्त केला.

आलिजाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल विविध क्रीडा संस्था, सामाजिक संघटना, नागरिक तसेच क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन करून इटलीतील आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment