Ads

सावलीत रानटी हत्तीचा कहर! व्याहाड–सोनापूर मार्गावर एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात भीतीचे सावट

सावली | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात रानटी हत्तीच्या हल्ल्याने पुन्हा एकदा वनपरिसर हादरला आहे. व्याहाड–सोनापूर मार्गावर रानटी हत्तीने केलेल्या भीषण हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
A terrible elephant attack in Savli taluka; One person died on the spot on the Vyahad-Sonapur road
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांसह दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक रस्त्यावर रानटी हत्ती समोर आला. प्रसंगावधान राखत तिघांनी दुचाकी सोडून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, हत्तीने एका व्यक्तीचा पाठलाग करून त्याच्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सावली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment