Ads

दारू तस्करीचा डाव फसला! माजरी पोलिसांचा दणका; मोपेडसह ७७,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


माजरी जावेद शेख : देशी दारूची अवैध वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जात असलेल्या आरोपींवर माजरी पोलिसांनी धडक कारवाई केली. पाटाळा फाटा, वणी-वरोरा महामार्गावर करण्यात आलेल्या या कारवाईत ४६ बाटल्या रॉकेट संत्रा देशी दारूसह मोपेड वाहन असा एकूण ७७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Liquor smuggling plot foiled! Majri police bust; Moped and valuables worth Rs 77,300 seized

दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१० वाजता माजरी पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पाटाळा फाटा परिसरात संशयास्पद हालचाल आढळून आली. यावेळी विनोद नथ्थुजी वल्हादे (वय ३८, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा) हा आपल्या ताब्यातील MH 34/CK 9476 क्रमांकाच्या मोपेडवरून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आला.

पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे ९० मिलीच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या ४६ बाटल्या, अंदाजे २ हजार ३०० रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आला. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अॅसेस कंपनीची मोपेड, किंमत ७५ हजार रुपये, असा एकूण ७७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

दरम्यान, पोलिसांना पाहताच त्याच्यासोबत असलेला समीर शेख (वय २४, रा. बेलगाव, ता. भद्रावती) हा घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला दारूसाठा दारासिंग संगतसिंग दुदानी (वय २५, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा) याच्या मालकीचा असल्याचे समोर आले असून विनोद वल्हादे व समीर शेख हे त्याच्याकडे दारू पोहोचविण्याचे काम करीत असल्याचा संशय आहे.

या प्रकरणी माजरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १४७/२०२६, कलम ६५(३१), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी (प्रभारी अधिकारी), पोहवा हरिचंद्र देऊळकर, पोलीस अंमलदार प्रमोद मिलमिले व पोलीस अंमलदार रविंद्र कन्नाके यांनी सहभाग घेतला.

माजरी पोलीस ठाण्याच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अवैध प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अशाच प्रकारच्या प्रभावी कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment