भद्रावती, जावेद शेख :-
भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे चंदनखेडा बीट परिसरातील खोकरी फाटा येथे नाकाबंदी करून संशयास्पद महिंद्रा NEO BOLERO वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी दारूसाठ्यासह वाहन असा एकूण ७ लाख ८५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.Illegal liquor transporting vehicle, including Bolero, worth Rs 7.85 lakh seized; case registered against three
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची महिंद्रा NEO BOLERO (क्र. MH 34 CJ 3175) ही गाडी अडवून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये सह्याद्री गोल्ड व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, कार्लसबर्ग बिअर, हायवर्ड ५००० बिअर तसेच टुबर्ग बिअरचा साठा आढळला. या दारूसाठ्याची किंमत ३५ हजार ४० रुपये, तर वाहनाची किंमत ७ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी दारासिंग सांगतसिंग दुधानी (वय ३१, रा. राजीव गांधी वॉर्ड, वरोरा) याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. तसेच वरोरा येथील निर्बान वाईन शॉपचे मालक आणि कदिर शेख (रा. चंदनखेडा) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कार्यवाही मुळे दारू तस्करी व इतर अवैध व्यावसायिकात खळबळ माजली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. प्रशांत शेंदरे (ब.नं. २४५४), पो.उप.नि. संतोष केदार, पो.हवा. देवानंद डुकरे, पो.हवा. गोपाल आतकुलवार, पो.ह. अनुप आस्टूनकर, पो.अं.खुशाल कावडे, योगेश घाटोळे, पो.अं. संतोष राठोड आणि महिला पोअं. प्रियदर्शनी बेरड यांच्या पथकाने केली.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment