Ads

कुचना येथे जुगार अड्ड्यावर माजरी पोलिसांचा धाड!

माजरी/कुचना( जावेद शेख) : सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर माजरी पोलिसांनी धडक कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते आणि गुन्ह्यात वापरलेले तीन अँड्रॉईड मोबाईल असा एकूण ८९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Majri police raid gambling den in Kuchana!

दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माजरी पोलिसांनी कुचना येथील रामनगर वसाहतीत पिंपळाच्या झाडाखाली छापा टाकला. यावेळी चार जण पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळताना आढळून आले.

या कारवाईत अमित मानिकसव परचाके (वय ३४), स्वप्निल सुभाष पिदुस्कर (वय ३०), अंकुश उर्फ शंकर हरिवंद्र महातके (वय ३८) आणि भास्कर महादेव चोपणे (वय ४९), सर्व रा. कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्यावर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी जुगाराच्या डावावरील २,८०० रुपये, ५२ पत्ते, आरोपींच्या अंगझडतीतील ६,८०० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले तीन अँड्रॉईड मोबाईल किंमत ८०,००० रुपये, असा एकूण ८९,७०० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला.

याप्रकरणी पोलीस स्टेशन माजरी येथे अपराध क्र. १४८/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष भोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस स्टेशन माजरीचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा. हरिचंद्र देऊळकर (ब.नं. २१५१), पोलीस अंमलदार प्रमोद मिलमिले (ब.नं. ९३४), पोलीस अंमलदार अशोक नायर (ब.नं. ६००५), पोलीस अंमलदार सोहन गुस्जुरे (ब.नं. २१५४), पोलीस अंमलदार सुरज वासेकर (ब.नं. १४६४) आणि पोलीस अंमलदार हेमंत बोरकर (ब.नं. १८२०) यांनी ही धडक कारवाई केली.

माजरी पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगाराच्या प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होणार असून, अशा अवैध प्रकारांविरोधात पोलिसांची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment