राजुरा प्रतिनिधि:- राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरूर स्ते इथे आज दिनांक ५-सप्टेंबर रोज आयोजित ग्रामसभा विना कारण व गावक-यानां पुर्व सुचना पत्र न देता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले नाही.Gram Panchayat locked down on Gram Sabha day at Virur Station
दिनांक १५-आगस्ट रोजी भव्य ग्रामसभेत ग्रामस्थांनी अंकेक्षण अहवालात भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सरपंच यांनी देऊ शकले नाही.
यामुळे अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी २० दिवसांची मुदत मागितली होती आणि 15 ऑगस्ट या दिवशी ग्रामसभा मधे सरपंच यानीं पुढील ग्रामसभेत दिनांक ५-सप्टेंबर रोजी स्पष्टीकरण देण्याचे कळविले होते
परंतु आज 5 सप्टेंबर रोजी ग्रामसभा बैठकीची माहिती असतांना सुद्धा सरपंच यानीं पुर्वसुचना न देता ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलुप बंद ठेवले आणि स्वतः गायब झाले व मेंबर सुद्धा गायब झाले.सरपंच यांना गाव चे युवा वर्ग फोन करित होते परुंतू सरपंच अनिल आलम हे फोन सुद्धा उचलत नसल्याने गावक-या मधे तीव्र नाराजी व रोष व्यक्त करित आहे . सकाळच्या सुमारास 10 वाजता पासून तर 12.50 पर्यन्त गाव करी वर्ग वाट बघत होते परंतु सरपंच व एक ही सदस्य ग्रामसभेकरिता आले नाही. सरपंच व सदस्य यांनी ग्रामसभा चे काहीच जबाबदारी ठेवली नाही व गावकरी चे सुद्धा काहीस मान ठेवले नाही.
त्यामुळे गावकरी यानीं वरिष्ठ अधिकारी यानां ग्रामपंचायत कमेटी विरूध्द योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0 comments:
Post a Comment