वरोरा : स्थानिक पैगाम साहित्य मंडळाच्या वतीने तालुक्यातील २८ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात एक हजार सव्वाशे नोटबुक, पेन्सिल व स्कूल बॅगचा समावेश होता.
Paigam Sahitya Mandal distributes school materials to 28 Zilla Parishad schools
परिसरातील शेगाव, माजरी, मुकुटबन, कळमगाव, करंजी, माढी, आष्टी, सालोरी, भद्रावती, कोंडा, लोधीखेडा, शेवई, सोनगाव, वडधा, वरोरा (मो.), उमरी, वरोरा (का.), साखरा, वडगाव, आकोशमत्ता आदी गावांतील तसेच वनोजा येथील २८ शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
गेल्या पाच वर्षांपासून पैगाम साहित्य मंडळ सामाजिक उपक्रमांत सक्रिय असून, मंडळाच्या वतीने आयोजित ‘महामुर्ख साहित्य संमेलन’संपूर्ण विदर्भात विशेष परिचित आहे. कोरोना काळातही मंडळाच्या वतीने दवाखान्यांमध्ये धान्यकिटचे वितरण करण्यात आले होते.
शालेय साहित्य वितरणाच्या उपक्रमासाठी मंडळाचे सचिव अशोक वर्मा तसेच सदस्य सर्वेशी जयंत टेमूर्डे ,अशोक धात्रक, राहील पटेल, खीरतकर,आष्टीचे उपसरपंच दिलीप उपरे यांचे विशेष योगदान लाभले.
0 comments:
Post a Comment