मोटर सायकल चोरी प्रकरण आरोपीला अटक; मुद्देमाल जप्त

भद्रावती, जावेद शेख़ दि. १५ ऑक्टोबर :
भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेना शेतवस्ती परिसरातून काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्नेहल संतोष महाकुलकर (वय २५, रा. पानवडाळा, ता. भद्रावती) यांस मुद्देमालासह अटक केली आहे. Accused arrested in motorcycle theft case; seized valuables

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय अनिल टोंगे (वय ३६, रा. गौतम नगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीला गेली होती. एमएच ३४ एएल ०६८६ क्रमांकाच्या या जुन्या वापरातील दुचाकीची अंदाजित किंमत २० हजार रुपये आहे.

दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.४५ वाजताच्या दरम्यान जेना शेतवस्ती परिसरातून ही दुचाकी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अप क्रमांक १००२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी स्नेहल संतोष महाकुलकर यांस अटक करून चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रशांत शेंद्रे, योगेश घाटोळे, गोपाल आतकुलवार, अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, खुशाल कावळे, संतोष राठोड, महिला पोलिस मोनाली गारघाटे आदींनी सहभाग घेतला होता.पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment