भद्रावती जावेद शेख प्रतिनिधी-
राज्यशासनाच्या आदेशावरून पंचायत समिती सभागृहात भगवान बिरसा मुंडा जंयतीचा कार्यक्रम जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
Lord Birsa Munda Jayanti celebrated by Panchayat Samiti
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ होते.प्रमुख अतिथी सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडुआकनुरवार,बाविप्रअ पुनम गेडाम,गटशिक्षणाधिकारी डाॅ.प्रकाश महाकाळकर होते.प्रथम बिरसा मुंडाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या वतीने जंयतीचा कार्यक्रम जनजातीय गौरव दिन,जनजातीय गौरव स्पताह साजरा करुन विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.यावेळी गविअ आशुतोष सपकाळ यांनी बिरसा मुंडा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते.आदिवासी समाजाच्या हक्कासाठी जल- जंगल-जमीन यांच्या रक्षणासाठी त्यांचा त्याग, संघर्ष व समाज सुधारणेचे कार्य देशासाठी प्रेरणादायी आहेत त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊ या,सहा.गविअ डॉ.बंडु आकनुरवार यांनी बिरसा मुंडा आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी व स्वाभाविकही संघर्ष केल्याचे सांगून आदिवासीचे जननायक, स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिसूर्य होते.बाविप्रअ पूनम गेडाम यांनी आदिवासी समाजाचे शौर्य, संस्कृती व परंपरेचा गौरव करणाऱ्या भगवान बिरसा मुंडा जंयती आदिवासी स्वाभिमानाचा प्रेरणा दिवस असल्याचे मनोगतात व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक/ संचालन कप्रअ उत्कर्ष तोडे आभार विस्तार अधिकारी महेश मिलमिले यांनी केले.पसचे सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment