विवाहित नवदांपत्य |
चिमूर/रोहित रामटेके
चिमूर:- प्रेमात अस थांबायचं नसत, मागे न वळता पुढेच चालायचं असत, ,ऐकमेकांची साथ घेवून जग जिंकायचं असत या शब्द रचनेला अनुसरून सुरज आणि काजल एकमेकांच्या प्रेमात गेले कित्येक वर्ष एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत होते. पण त्याचं प्रेम हे तितेच थांबले नाही तर एकमेकांना जीवनभर साथ देण्याची आण दोघांनी घेतली परंतु हिंदी पिक्चर च्या प्रेम कहाणी प्रमाणे एखादी विलन तर असतोच पण त्या विलनच्या पोकळ धमक्या न घाबरता दोघाणी लग्न करण्यासाठी त्यांनी तंटा मुक्त समिती मालेवाडा येथे धाव घेतली तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष मा. बापूराव परसराम घोडमारे (बंडूभाऊ ) यांनी पुढाकार घेवून उपासक सुरज /ज्ञानेश्वर महेंद्र गजभिये व उपासिका काजल नरेश गोंगले यांचा विवाह सोहळा पार पाडला.
लग्न सोहळा करिता श्री काशिनाथ लक्ष्मण गजभिये व श्री संभाजी दत्तू गजभिये यांनी मुलाच्या वडिलांची भूमिका, श्री. अशोक गेडाम व श्री नीलकंठ चांगो बांबोडे यांनी मुलीच्या वडिलांची भूमिका पार पाडली कार्यक्रम यशस्वी करण्या करिता शांताराम शेंडे (बौद्ध पंच कमेठी अध्यक्ष ) कैलास देवाजी शेंडे (उपसरपंच) सुहास गजभिये हरी गजभिये प्रतिक शेंडे सुयोग मेश्राम स्वप्नील मसराम कुणाल वरखडे प्रवीण वरखडे संदीप गजभिये दुर्योधन गजभिये`हिरा गजभिये व समस्त नवयुवक मैत्री संघ मालेवाडा यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment