खबरी असल्याचा संशयावरून
नक्षल्यांनी केली तिघांची हत्या
गडचिरोली/प्रतिनिधी:भामरागड तालुक्यातील आलापल्ली मुख्य मार्गावरील कोसफुंडी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी तीन मृतदेह आढळले. आजूबाजूला बघितले असता नक्षलवाद्यांचे बॅनर सुद्धा आढळून आल्याने खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी या तिघांची हत्या केल्याचे समजते आहे या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ माजली असून गावकरी भयभीत झालेले आहे
मालू दोघे मडावी,कन्ना रेणू मडावी,लालसू मासा कुळयेटी या हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत
एप्रिल 2018 मध्ये कसनासूर-तुमीरगुंडा येथे पोलिस व नक्षलवादी मोठी चकमक झाली होती यात पोलिसांनी चाळीस नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता ही सर्वात मोठी कारवाई 2018 मध्ये करण्यात आली होती याच घटनेची खबरी असल्याच्या संशयावरून यांची हत्या करण्यात आल्याचे समजते आहे.
0 comments:
Post a Comment