ह.भ.प.लक्ष्मणराव पाटील
मायणी : (सतीश डोंगरे)खटाव तालुका जि.सातारा पुसेसावळीतील माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांच्या वडिलांच्या पुण्य स्मरणार्थच्या निमित्ताने दोन मुली असलेल्या माता पित्यांचा सत्कार करून लेक वाचवा अभियानास चालना देण्याचा नवीन पायंडा पाडला असल्याचे मत वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.लक्ष्मणराव पाटील यांनी मांडले,
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर समाजकल्याण सभापती शिवाजराव सर्वगोड, धैर्यशील कदम, बबनराव कदम, सुर्यकांत कदम ,अनिल माने, विलास शिंदे नंदकुमार मोरे, एस.के.पिसाळ, सी.एम.पाटील, दादासो कदम,आदिंची उपस्थिती होती.
पुढे पाटील म्हणाले की या कुटुंबाने सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले असुन त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यामातून लेक वाचवा अभियानातुन विविध उपक्रम राबवल्यामुळे आजही त्याला चालना देण्याचे काम करित आहेत.
तद्नंतर दहा माता पित्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आला,
यावेळी किरण माळवे,अमोल माळवे,दिलीप पुस्तके,
सुरेश शिंदे,शंकरराव खाडे,सुभाष गुरव, राजेंद्र गोडसे,
श्रीमंत कोकाटे बजरंग रोमन आदि ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते,
मानसिंगराव माळवे यांनी प्रास्ताविक केले,तर रायसिंग माळवे यांनी आभार मानले.
0 comments:
Post a Comment