चंद्रपूर - राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार प्रकल्पात काम करणारे हजारो संगणक परिचालक यांनी शासनाला वेळोवेळी मागण्याचे निवेदन देऊ नये जाग न आल्याने 28 ऑगस्टला राज्यातील सर्व पंचायत समितीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आठ वर्षापासून प्रामाणिकपणे काम करून डिजिटल महाराष्ट्र साकारणाऱ्या संगणक परिचालकांना शासनाकडून आतापर्यंत आश्वासन पूर्ती शिवाय काही मिळाले नाही. शासन परीचालकाकडून रात्रंदिवस काम करून, शेतकरी कर्जमाफी योजनेचा काम सुद्धा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे एक एक वर्ष मानधन मिळत नाही. शासनाने आम्हाला किमान वेतन पंधरा हजार रुपये दर महिन्याला द्यावे. वेतन राज्य शासनाच्या निधीतून द्यावे,. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी, थकित मानधन द्यावे यासह विविध मागण्यासाठी चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत काम करणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परीचालकाना आपल्या हक्काच्या मागणीसाठी पंचायत समिती समोर एक दिवसीय धरणे आंदोलन देण्यात आले त्यात संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश बावणे, विवेक डोर्लीकर, मोहन धोटे, विकास ढोके, कैलास पुनमशेट्टीवार, नितेश काकडे, जैनाब पठाण, व सर्व संगणक परिचालक यांची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment