पोलीस निरीक्षक हाके आणि उपपोलिस निरीक्षक लाकडे यांच्या पथकाची कारवाई!
चंद्रपूर शहरात दारु माफिया म्हणून ज्यांची ओळख आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा शहर अध्यक्ष दिपक जयस्वाल यांना पुन्हा पोलिसांनी अवैधरीत्या त्यांच्या राहत्या घराजवळ गाडीमधून दारु उतरविताना त्यांच्या साथीदारांना रंगेहाथ पकडल्या नंतर त्यांचे नाव समोर आल्याने त्यांना पण अटक केली आहे.यामध्ये दिपक जयस्वाल यांच्यासह राकेश चीत्तुरवार, मयूर लहेरीया यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशनमधे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.दिपक जयस्वाल यांच्यावर याआधी पडोली पोलीस स्टेशन. गोंडपिंपरी पोलीस स्टेशन येथे सुद्धा गुन्हे दाखल आहे. दुपारी एक वाजता दिपक जयस्वाल यांच्या गजानन मंदिर जवळील एका गोडाऊन मधे गाडीमधून दारु उतरविताना रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके आणि उपपोलिस निरीक्षक लाकडे यांच्या टीमनी धाड टाकून हीं कारवाई केली. जवळपास साडेपांच लाखांच्या दारुसाठ्यांसह ऐकून पंधरा लाखांचा मुद्देमाल जब्त करण्यात आला.
0 comments:
Post a Comment