अज्ञानाचा पाढावाचून महाराष्ट्राच्या एकमेव
काँग्रेस खासदारांनी केली बोळवण!
चंद्रपूर, चंद्रपूर महानगरात सध्या देशात वायु प्रदूषण चौथ्या स्थानी असल्याची नोंद सांगितल्या जाते. या जिल्ह्यात, शहरात असलेल्या महाऔष्णिक वीज केंद्रातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची माहिती खासदार सुरेश धानोरकर यांनी दिली.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले महाराष्ट्र राज्याचे एकमेव काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी मंगळवार 10 डिसेंबरला संसदेच्या सभागृहात आपले अज्ञानाचा पाढा वाचून एकमेव निवडून आल्याचा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण राज्यात महाराष्ट्राची बोळवण केल्याचे पहावयास मिळाले.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक एक आणि दोन अनुक्रमे ऑगस्ट 2014 आणि जानेवारी 2016 रोजी बंद केले असताना, अद्यापही या संचातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची माहिती यांनी सभागृहात दिली. शहरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण असल्याची व मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याची माहिती सभागृहात मांडणी केली. सोबत या केंद्रातील संच क्रमांक 1 आणि 2 मधून अनुक्रमे 381 मिलीग्राम क्यूबिक मिटर' आणि 643 मिलीग्राम पर क्युबिक मीटरने सातत्याने सस्पेडेड पार्टिकल निघत असल्याने त्यांनी ठामपणे सभागृहात सांगितले.
पण प्रत्येक्षात हे दोन्ही संच ऑगस्ट 2014 आणि जानेवारी 2016 रोजी बंद केले आहेत. किंबहुना आता तर या दोन्ही संचाचे लीलाव होणार आहे. महानगरात राहणाऱ्या नागरिकांनाही ही माहिती आहे. मात्र महाराष्ट्राचे एकमेव निवडून आलेले खासदार त्यांना ती माहिती नसावी आणि चक्क सभागृहात हा विषय ठेवावा आणि जनतेची दिशाभूल करावी, हा मात्र चंद्रपूर महानगरात चर्चेचा विषय बनला आहे.
पूर्वी आमदार असलेले आणि शिवसेनेला फोटो करून मोठा आटापिटा करून काँग्रेसची शीट मिळवणारे सुरेश धानोरकर हे एकमेव महाराष्ट्रात काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांनी चंद्रपूरचे आणि माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करून ते निवडून आले. सध्या केंद्राचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या सभागृहात चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत ठेवून, मांडण्याचा प्रयत्न केला, विषयाची माहिती नसल्याने आणि अभ्यास न करता सभागृह मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
खासदारांनी मांडलेल्या विषयावर ओस्वाल म्हणाले,
कि, संच क्रमांक 1 आणि 2 लिलावात निघालेले महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक एक व दोन हे अनुक्रमे ऑगस्ट 2014 आणि जानेवारी 2016 मध्येच बंद केले आहेत. त्याला आता चार-पाच वर्ष होऊन गेली. त्यामुळे या संचा मुळे प्रदूषण होणे अशक्यच आहे. किंबहुना आता तर हे संच पूर्णपणे लिलावात निघाले आहेत. असे स्पष्ट मत महाऔष्णिक वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता, जनसंपर्क अधिकारीअधिकारी ओस्वाल यांनी माध्यमांना दिली.
0 comments:
Post a Comment