विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाअधिकाऱ्या निवेदन
चंद्रपूर :- विनाअनुदानित घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत केंद्र सरकारने वाढ केल्याचे निषेधात चंद्रपूर येतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांच्या समवेत जिल्हाधिकार्यालयावर केंद्र शासनाच्या 145 रुपयाच्या दरवाढीच्या निषेधार्थ तसेच सलग सरकारकडून सातव्यांदा वाढ करण्यात आली. त्यामुळे सरकारची अच्छे दिन कुठाय असा प्रश्न आता जनता करू लागली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. सर्वांसाठी हा निर्णय धक्कादायक असून या दरवाढीच्या निषेधात आज संपूर्ण महाराष्ट्रातच नवेत देशात याचा निषेध नोंदवला गेला. सरकारने दरवाढ मागे घ्यावी अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाअध्यक्ष सौ बेबीताई उईके यांनी दिला. यावेळी शहराध्यक्षा ज्योतीताई रंगारी, यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
0 comments:
Post a Comment