शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देणार मा धनराजभाऊ मुंगले
चंद्रपूर :- गुरुवार दि.6 फरवरी 2020 दुपारी 2.00 वा. भिसी येथे उमरेड रोड वर असलेल्या श्रीहरी गजानन जिनिंग-प्रेसिंग अँड ऑइल इंडस्ट्रीज च्या माध्यमातून भव्य कपास खरेदीचा उद्घाटन सोहळा पार पडला
सदर कार्यक्रमास प्रथम कापूस विक्रीला आणणाऱ्या 21 शेतकरी आणि गाडी चालकांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आणि भजन मंडळी महिला व पुरुषांना वस्त्र दान करण्यात आले
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणांमधून श्रीहरी गजानन जिनिंग-प्रेसिंग अँड ऑइल इंडस्ट्रीजचे मालक मा श्री धनराजभाऊ मुंगले यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देऊन त्यांचा कापूस खरेदी करण्याचे आश्वासन दिले कापूस खरेदीतून नफा मिळविता आला नाही तरी माझ्या चेहऱ्यावर सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याचे समाधान नेहमी राहील
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा श्री नंदू पाटील गावंडे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर तर उद्घाटक म्हणून श्री कवडु रघुनाथजी मुंगले उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ रमेशकुमार गजबे माजी राज्यमंत्री, कृषीभूषण मोरेश्वर झाडे, विजयकुमार घरत माजी जिल्हा परिषद सदस्य, शंकर घरत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर, ढोणे साहेब सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती चिमुर, प्रमोद गौरकार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चिमुर, जहांगीर भाई कुरेशी माजी सरपंच नागभीड, विनायकरावजी चिलबुले, डॉ राजेश मुंगले, प्राचार्य राजेंद्र जाने सर, डॉ दिलीप राऊत उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सारंग भाऊ भिमटे तर आभार प्रदर्शन श्री भीमरावजी वंजारी यांनी केले या कार्यक्रमाला भिसी तथा परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 comments:
Post a Comment