Ads

नागभीड येथे आशा दिवस उत्साहात संपन्न. शासनाच्या आरोग्यविषयक प्रत्येक योजनांची माहितीनागभीड येथे आशा दिवस उत्साहात संपन्न.
        शासनाच्या आरोग्यविषयक प्रत्येक योजनांची माहिती व लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहचविणाऱ्या तसेच गरोदर मातेची वेळोवेळी आरोग्य तपासणी व नवजात शिशु यांचे संगोपन नियमितपणे करण्याचे पुण्यकार्य आशा वर्कर वर्षाचे ३६५ ही दिवस अव्याहतपणे करीत असुन अत्यंत कमी मोबदल्यावर काम करणाऱ्या या आशा सेविकांचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी नागभिड येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नागभिड यांचे मार्फत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेल्या “ आशा दिवस “ च्या उद्घाटनप्रसंगी केले व इतरांसाठी नेहमीच सेवा देणाऱ्या या आशा सेविकांनी हा एकच दिवस त्यांनी स्वत:साठी आनंदात व उत्साहात साजरा करावा असे सांगितले.
       कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपुर जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नागभिड पं.स.च्या सभापती सौ. प्रणया गड्डमवार यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पं.स.नागभीडच्या संवर्ग विकास अधिकारी कु.प्रणाली खोचरे मॅडम यांची उपस्थिती होती .
         सदर कार्यक्रमात सौ.गड्डमवार व कु.खोचरे मॅडम यानी आशा सेविकांच्या कार्याचा गौरव करीत मानधन वाढीसाठी शासनदरबारी त्यांच्या भावना पोहचविण्यासाठी आम्ही सोबत राहु असे सांगितले. समयोचित मार्गदर्शनानंतर सर्व आशा सेविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहण्याकरिता विपश्यना द्वारे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा प्रभागनिहाय सत्कार करण्यात आला.
         यानंतर आशा सेविकांद्वारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. आशा सेविका मार्फत कार्यक्रमामध्ये विविध नृत्य, आरोग्याविषयी सामाजिक संदेश देणारे व जनजागृती पर नाट्य, एकांकिका, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
     कार्यक्रमाचे आयोजन नागभीड तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.विनोद मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रस्तावना आरोग्य संयोजक कामडी यांनी केली तर संचालन श्रीमती शेबाताई पर्वते यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व आशा सेविका, आशा पर्यवेक्षिका, एनसीडी टीम व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील पूर्ण कर्मचारी उपस्थित होते.

==============
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment