स्नेह मिलन,हळदी कुंकू व महिला मेळावा कार्यक्रम संपन्न* मौज विचोडा(बु) येथील श्री.अनिल डोंगरे व सौ.किरण डोंगरे यांच्या माध्यमातून वरील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात विचोडा(बु) व विचोडा (रै) येथील महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे उदघाटक.मा.संध्याताई गुरनुले जी.प अध्यक्ष चंद्रपूर.या होत्या.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष.मा.नितुताई चौधरी बालकल्याण सभापती जी.प चंद्रपूर.तर प्रमुख अतिथी मा.ब्रिजभूषण पाझारे जिल्हा अध्यक्ष भा.ज.यु.मो चंद्रपूर.मा.केमा रायपुरे.सभापती प.स चंद्रपूर.मा.वाणीताताई आसुटकर जी.प सदक्ष. मा.निरक्षन तान्द्रा उपसभापती प.स चंद्रपूर.मा.शोभाताई पिदूरकर तालुका अध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर मा.अर्जुन नागरकर उपसरपंच.मा.अनु ठेंगणे.हे होते .या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रजवलन व सावित्रीबाईंच्या फोटोला माल्यार्पण करून झाली.कार्यक्रमात मान्यवरांचे भाषणे व मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचा शेवट उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून साडी भेट देऊन झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल महल्ले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रमोद जाधव.रेखा महल्ले. कोमल बोन्द्रे. पल्लवी महल्ले.सोनू कुलमेथे. यांनी विशेष परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment