Ads

राजुरा-खामोना-गडचांदुर मार्गावरून चालणाऱ्या कोळसा ट्रॅक कोळसा चोरून मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या प्रविण करमरकर कडे प्रशासणाचे दुर्लक्ष का? 

चंद्रपूर :राजुरा -

काळ्या सोन्याची जननी असलेल्या चंद्रपूरात कोळश्याची तस्करी जोमात सुरू आहे. अनेक छोटे-मोठे पांढरपेशा तस्कर या व्यवसायात सक्रिय आहेत. रेल्वे साईडिंग पासून तर वेकोलीच्या खदानीतुन मोठ्या उद्योगांकडे जाणारा कोळसा वेकोली चे अधिकारी-रेल्वेचे कर्मचारी व ट्रक ड्रायव्हर यांच्याशी हातमिळवणी करून कोळसा चोरीमध्ये गब्बर झालेला राजुरा येथील कोळसा तस्कर प्रविण करमरकर आपली पोलिसांशी कमालीची सांठगांठ असल्याची बतावणी करतो.

सविस्तर वृत्त असे की, उद्योगांना पुरवठा होणाऱ्या कोळशाची मोठ्या प्रमाणात चोरीहोत आहे. यासोबतचं रेल्वे साईडिंग वरून कोळसा काढण्यात हातखंडा असलेला राजुरा येथील कोळसा तस्कर प्रविण करमरकर याने तर हद्दचं केली आहे. राजुरा-खामोना-गडचांदुर मार्गावरून प्रविण करमरकर याच्या कोळशांनी भरलेल्या गाड्या हमखास बघायला मिळतात. भर रस्त्यावर कोळश्याचे ट्रॅक थांबवून प्रविण करमरकर याचेसाठी कोळसा खाली करतात, त्यानंतर दिवसाढवळ्या प्रविण करमरकर याचे मजूर हा कोळसा ट्रॅक्टर मध्ये भरून डोहाळतात. 

त्याचप्रमाणे कोळसा भरून उद्योगांकडे जाणारी रेल्वे याच प्रविण च्या इशाऱ्यावरून अवधीपेक्षा जास्त वेळ थांबविल्या जाते. त्यानंतर याठिकाणाहून करमरकर ची माणसे रेल्वे वॅगन वरून कोळसा उतरवितात व स्वतःच्या मालकीची खदान असल्यागत हा कोळसा खुले आम चोरी केला जातो. राजुरा येथील पोलिस, एलसीबी यांच्याशी आपली जबरदस्त साठगांठ असून नुकत्याच त्याच्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. अल्पशा मजुरीवर काम करणाऱ्या मजदुरांची जमानत घेतली आपण मात्र अद्याप ही बाहेरचं फिरत आहोत, पोलिसांना प्रत्येक महिन्यात त्यांची धनराशी पोचती होत असते.

किती ही पोलिस आले अन् गेले तरी आपले कोण काही बिघडवू शकत नाही, अशा थाटात कोळसा चोर प्रविण करमरकर खुले आम बोलत असतो. सगळ्यांनाच आपण 'मॅनेज' केले आहे, आपले कुणीही काही बिघडवू शकत नाही. गुन्हा दाखल करतील, परंतु धंदा मात्र 'त्याचकरणार या मगरूरीत वावरणारा प्रविण करमरकर ला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांची चौकशी करून याला या क्षेत्रातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी सुद्धा अनेकांनी केलेली आहे.

नुकतेच नागाडा येथील कोल डम्पींग वर एलसीबीच्या पथकाने कोळश्याचे मोठे घबाड पकडले होते. त्यानंतर राजुरा येथे होणाऱ्या प्रविण करमरकर यांच्या कोळसा चोरीवर पोलिस काय कारवाई करतात, याकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment