Ads

वणीत नाभिक कर्मचारी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने जीवनावश्यक किटचे वाटप !





वणीत नाभिक कर्मचारी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने जीवनावश्यक किटचे वाटप !

:प्रतिनिधी दिनचर्या न्युज :-
वणी :-

देशावर सध्या कोरोना वायरसने थैमान घातले आहे. अजूनही त्याचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाने दिनांक २२ मार्च 2020 पासून लाकडाऊन घोषित केला आहे.
या लाकडाऊनला नाभिक सलून दुकानदारांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी सहकार्याची भूमिका निभावित आहेत. मात्र यात नाभिक समाजाची हातावर आणून पानावर खाणाऱ्या सलून कामगारांची चांगलीच भूक मारी झाली. सर्व दुकान बंद असल्यामुळे दुकानदार व कारागीर अडचणीत सापडला आहे. तसाही हा समाज अत्यंत गरीब समाज असून, रोज कमवून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणारा वर्ग आहे.



या संकटात पडलेल्या समाजबांधवांचा विचार करून वणी येथील नाभिक कर्मचारी संघ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाभिक सलून दुकानदार,  कारागीर यांना जीवनावश्यक वस्तूच्या किट वाटप करून,  त्यांना मदतीचा हात देऊन, एवढ्यावरच थांबले नाही तर,  भविष्यात समाजावर कोणतीही गरज पडल्यास मदत करण्याचे आव्हान,  बंडूभाऊ येसेकर,  सुरेश मांडवकर,   प्रवीण नागपुरे,  विजय कडू कर,  हेमराज कडुकर,  अशोक मांडवकर,  भालचंद्र,  किशोर निंबाळकर,  नरेश नक्षीने,  श्रीमती छाया नक्षीने,  राजू निंबाळकर,  प्रशांत घुमे,  यांनी केले आहे. 
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment