दिनचर्या न्युज :-
वरोरा :- केंद्रीय नवोदय समिती नवी दिल्ली मार्फत जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत वरोरा येथील सेन्ट अॅनिस हायस्कूल मधिल इयत्ता पाचवी चा विद्यार्थी स्पंदन शालिनी गांधी बोरकर यांची तळोधी बाळापूर येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी साठी निवड झालेली आहे. स्पंदन च्या घवघवीत यशाबद्दल सेन्ट अॅनिस मुख्याध्यापक, शिक्षक वूंद, मित्र परिवार तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे. स्पंदन ने त्याच्या यशाचे श्रेय आजी अनुसयाबाई मानिक वाघमारे, मार्गदर्शक आलमवार मॅडम, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवूंद आणि आईवडिलांना दिले आहे.
0 comments:
Post a Comment