चंद्रपूर
चंद्रपूर----दिनचर्या न्युज
-महाराष्ट्राचे लाडके उप मुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवासा निमित्य चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या वतीने खेमाजी नाईक आश्रम शाळा कारवा येथील शाळेच्या आवारात विविध प्रजातीच्कया झाडांची लागवड दि.२२.७.२०२०ला सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे ओबीसी सेल चे प्रदेश सरचिटणीस, दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के.आरिकर,जिल्हा अध्यक्ष डॉ. पंकज पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर व शाळेतील इतर शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्या वेळी झाडांचे महत्व व त्यापासून कसे फायदे होतात यावर अनेकांनी आपले विचार मांडले व पर्यावरण अबाधित ठेवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने झाडांची लागवड करून त्यांचे जतन करणे आपले काम आहे असे या वेळी विषद करण्यात आले.
0 comments:
Post a Comment