Ads

२०० रुपये कमावणाऱ्या नाभिकाच्या मुलीची गगनभरारी, बारावीच्या परीक्षेत मिळवले ९९.५ टक्के गुण panjab

"मुलीच्या यशानं कुटुंबीयांच्या डोळ्यात आंनदाचे अश्रू आहेत"

जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर नाभिकाच्या मुलीनं यशाला गवसणी घातली आहे. पंजाब बोर्डाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये नाभिकाच्या मुलीनं मिळवलेले गुण पाहून सर्वजण थक्क झाले. व़डील नाभिक असणाऱ्या जसप्रीत कौरने ९९.५ टक्के गुण मिळवत वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे.

जसप्रीत कौरच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे कोचिंग क्लासेसही कधी तिने पाहिले नाहीत. जसप्रीतने घरीच आपल्या अभ्यास करुन न भूतो न भविष्य असं यश संपादन केलं आहे. जसप्रीत कौरचे वडील बलदेव सिंह एक नाभिक असून प्रतिदिन ते सरासरी दोनशे रुपये कमावतात.

जसप्रीत कौर मनसा जिल्ह्यात राहणारी आहे. तिच्या या उज्वल यशानं गावात आनंदाचं वातावरण असून सर्वजण शुभेच्छा देत आहेत. तुमची मुलगी हुशार असल्याचं गावातील सर्वजण बलदेव सिंह यांना म्हणतात. गावातील लोकांचे हे शब्द ऐकून बलदेव सिंह यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात.

जसप्रीतने पंजाब बोर्डाच्या परीक्षेत ४५० पैकी ४४८ गुण मिळवलं आहेत. जसप्रीत मेरिट लिस्टमध्ये आली आहे. जसप्रीतला एमफील करायचं असून इंग्रजी विषयाचं प्राध्यापक व्हायचं आहे. शिक्षण घेत काम करणार असल्याचं जसप्रीतनं माध्यमांना सांगितलं.


दिनचर्या न्युज 

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment