भद्रावती / प्रतिनिधी – जावेद शेख
भद्रावती तालुक्यातील खासदार आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेल्या मौजा चंदनखेडा ग्रामपंचायतीमध्ये पायका योजनेअंतर्गत क्रीडांगणाच्या कामास मंजुरी मिळाली असून, त्या कामाचे भूमिपूजन सोहळा चंद्रपूर–वणी–आर्णी लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने उत्साहात पार पडला.Bhoomipujan of playground completed under Paika Yojana
हा भूमिपूजन कार्यक्रम चंदनखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. नयन बाबाराव जांभुळे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रकाश रामटेके, ग्रामपंचायत सदस्य श्री. निकेश भागवत, श्री. बंडूजी निखाते, सौ. प्रतिभा दोहतरे, सौ. मुक्ता सोनुले, सौ. रंजना हनवते, सौ. सविता गायकवाड, सौ. श्वेता भोयर, श्री. नाना बगडे, सौ. आशा ननावरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पायका योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या या क्रीडांगणामुळे गावातील युवक व खेळाडूंना खेळासाठी योग्य सुविधा उपलब्ध होणार असून क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांनी खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment