जखमी नागाला पकडून त्याच्यावर उपचार करून जिवदान दिले
काल दिनांक 27/08/2020 रोजी वरोरा (जिल्हा चंद्रपूर) येथील N E W FOUNDETION चे सर्परक्षक विशाल ढोक व संतोश वाणी यांनी एक जखमी अवस्थेत नाग पकडला....
वनविभागाच्या कार्यालयात पंचनामा करुन उपचार करण्या साठी नेला असता कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी व अधीकाऱ्यांनी अक्षरशः हाकलून दिले व *स्वतः त्यावर उपचार करा .मग आमच्या कडे आणुन द्या असे म्हटले ...*
त्यांना विनंती केली की यावर उपचार करायचे आहे..
पन ऐकायला तयारच न्हवते..
त्या अधिकाऱ्यांना श्री बाळुभाउ जिवणे.(पत्रकार व सर्पमीत्र).
श्री सुशिल शिरसाट (पत्रकार व सर्पमीत्र).
यांनी विनंती केली की या नागावर उपचार करावा .पन अधिकारी ऐकायलाच तयार न्हवते..
शेवटी वरच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली..
जेव्हा वरुन दबाव आला तेव्हा त्या जखमी नागावर सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आला...
नाहीतर तो नाग तसाच उपचाराविना दगावला असता....
वनविभागाच्या कार्यालयात असे अधिकारी असतिल तर वन्यजीव कसे वाचतिल व त्यांचे रक्षण कसे होतील...
सर्पमित्र, वन्यजीव रक्षक , सेवाभावी संस्था NGO पुढाकार घेउन काम करत आहेत तर सहकार्य सुद्घा वन विभागातील कर्मचारी व अधिकारी करु शकत नाही हिच आजची परिस्थिती बघावयास मिळत आहे..
वरिष्ठ अधिकारी बोलतिल तेव्हाच काम करणार कां .?
सामान्य लोकांच ऐकायचच नाही असे तर ठरवले नसेल ना.
सरते शेवटी त्या जखमी नागावर सरकारी दवाखान्यात डॉ शेंद्रै व डॉ खिरटकर यानी उपचार केले व *अशा प्रकारे एक नाग मृत्यू च्या दाढेतून बाहेर आला..*
या साठी
बाळुभाउ जीवणे,
सुशिल शिरसाट,
प्रविन खिरटकर ,
सर्पमीत्र विशाल ढोक..
सर्पमित्र संतोष वाणी ,
सर्पमीत्र अनिकेत मेश्राम,
सर्पमीत्र मयुर चट्टे. (N E W FOUNDETION चे सदस्य)
डॉ शेंद्रे व डॉ खिरटकर
यांनी अथक परिश्रम घेतले...
✒️सर्परक्षक राज येरणे
0 comments:
Post a Comment