राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी. त्यास अनुसरुन श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व पोळा/तान्हा पोळा सुध्दा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
बिनतारी संदेश, सर्व ठाणेदार चंद्रपुर जिल्हा
सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर जिल्हा
:- पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
जा.क. जिविशा/जातीय/ श्रीकृष्ण जन्माष्टमी/पोळा-तान्हा पोळा/ प्रतिबंध/२०- २८3४ दि. ०४/०८/२०२०
- दिनांक ११/०८/२० व १२/०८/२०२० रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दिनांक १८/०८/२० व १९/०८/२०२० रोजी पोळा/तान्हा पोळा साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन गृह विभाग मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक डी.आय.एस-०६२०/प्र.क्र.९१ / विशा - १ ब, मंत्रालय, मुंबई. दिनांक १७ जुलै २०२० अन्वये व अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी, चंद्रपुर यांचे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ३४ पोट कलम (ग) (c) व (ड) (M) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ४३ अन्वये अधिकाराचा वापर करून मोठया प्रमाणावर लोकांचा समुह एकत्र जमु न देण्यासाठी संपुर्ण चंद्रपुर जिल्हयामध्ये घेण्यात येणाऱ्या सभा, सामाजिक/धार्मीक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, धार्मीक/ सांस्कृतीक कार्यक्रम ईत्यादी दिनांक ०१ ऑगष्ट ते दिनांक ३१ ऑगष्ट २०२० पावेतो बंदी लागु घातलेली आहे.
कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व पोळा/तान्हा पोळा सुध्दा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता, नागरिकांनी आप-आपल्या घरी साजरा करण्याबाबत स्थानिक प्रशासन, शांतता समीती सदस्य व प्रतीष्टीत नांगरीकांच्या बैठकीत सुचना देण्यात याव्यात.
0 comments:
Post a Comment