Ads

विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश




विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश


दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर : राज्यातील कायम शब्द वगळलेल्या विनाअनुदान शाळांना अनुदान देण्यासाठी निश्चित केलेल्या अटी व शर्थीनुसार अनुदानास पात्र ठरलेल्या व १३ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्गमित वेतन अनुदानासाठी घोषित केला होता. त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच तुकड्यांना २० टक्के अनुदान व २० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना ४० टक्के पुढील टप्पा देणे, तसेच वित्त विभागाने घातलेल्या जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शिक्षक - कर्मचाऱ्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या विषयाच्या पाठपुरावा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला होता, त्याला यश आले आहे. आमदार धानोरकर यांनी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आभार मानले.
या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक व उच्च  माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के व ह्या याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या २४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान एक नोव्हेंबर २०२० पासून देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या लाभ एकूण ४२,११२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार आहे. शिक्षकाच्या प्रश्नासाठी पुढे देखील लढा सुरूच ठेवणार असल्याचे  आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले. 
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment