पद्मापूर ओपन कास्ट कोळसा खदान मध्ये मोठी दुर्घटना होताना थोडक्यात वाचली!
 नशीब बलवान म्हणून सहा कामगार वाचले. 
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज 
 पद्मापूर येते ओपन कास्ट कोळसा खदान मध्ये आज मोठी दुर्घटना होताना थोडक्यात वाचली,  नशीब बलवान म्हणून सहा कामगारांचे  जीव वाचले. दुर्दैवाने कोणतीही  जीवित हानी झाली नाही.  दुपारचे वेळी अचानक मोठा मातीचा डेला  पडल्याने करोडो रुपयाची तीन डिल मशीन मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली,  त्या अगोदर मशीन वर सहा कामगार काम करीत होते.  परंतु नशिबवान कामगारांना कुठलीही हानी झाली नाही. दुपारचा  लंच टाईम असल्यामुळे ते खदान च्या बाहेर आले होते.  अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे नेहमीच अशा घटना होत असतांना सुद्धा वेकोलिच्या अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असतात.  आणि वेळ मारून काम करून घेत असतात.  त्यांना कामगारांची कुठलीही पर्वा राहत नाही डब्ल्यू सी. एल च्या मुख्य प्रबंधक अधिकारी नेहमीच सुरक्षा संदर्भाचे खोटे आश्वासन देत असतात.  त्यात आज पद्मापूर मध्ये कोळसा खदान च्या घटनेचे जिते जागते उदाहरण म्हणता येईल.  सुरक्षेच्या नावावर कर्म चाऱ्याच्या जीवावर खेळून वेकोलि अधिकारी   कोळसा काढण्याचे काम करीत असतात.  ही झालेली दुर्घटना म्हणजे  कर्मचाऱ्यांचे नशीब बलवान म्हणून दुर्घटना टळली!  भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये याकडे डब्लू सी एल च्या महाप्रबंधकानी  सुरक्षा प्रधान करावी. 
 

0 comments:
Post a Comment