Ads

आपण थकीत वीज ग्राहक आहात?*_ _*आपला वीज पुरवठा थकीत रकमेसाठी खंडित केलेला आहे आणि आपल्याला तो चालू करायचा आहे पण आपण एकरकमी थकीत रक्कम भरण्यास असमर्थ आहात,

_


*आपण थकीत वीज ग्राहक आहात?*_
_*आपला वीज पुरवठा थकीत रकमेसाठी खंडित केलेला आहे आणि आपल्याला तो चालू करायचा आहे पण आपण एकरकमी थकीत रक्कम भरण्यास असमर्थ आहात,*_

*तर हे नक्की वाचा...*

*थकीत वीज देयकाची फक्त २% रक्कम भरा आणि मिळवा सुलभ हफ्यात वीज देयक भरण्याची सुविधा*

दिनचर्या न्युज :- चंद्रपूर
महावितरणने आपल्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा देत आता सुलभ हफ्त्यांमध्ये वीज देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
यामध्ये कृषी ग्राहक सोडून इतर सर्व वीज पुरवठा चालू असलेले व कायमस्वरूपी किंवा तात्पुरता वीज पुरवठा खंडित असलेले ग्राहक, न्यायालयात खटला दाखल असलेले ग्राहक बिनशर्त माघार घेण्यास तयार असतील असे ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
याआधी हफ्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा ही केवळ कायमस्वरूपी किंवा तात्पुरता वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनाच होती.
परंतु आता ही सुविधा वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांबरोबर वीज पुरवठा चालू असलेल्या थकबाकीदार किंवा चालू देयकाची रक्कम हफ्त्यांमध्ये भरू इच्छिणाऱ्या ग्राहकांना देखील उपलब्ध असेल.

वीज कायदा कलम १२६, १३८ किंवा १३५ च्या अंतर्गत कारवाई केलेले ग्राहक, वीज चोरीची रक्कम पूर्णपणे भरून, इतर थकीत रकमेवर सुलभ हफ्त्यात वीज देयक भरण्याच्या सुविधेचा लाभ घेता येईल.

*आर्थिक विवंचनेत सापडलेल्या, उद्योग/व्यवसायाचा वीज पुरवठा सुरू करून त्याला पुनर्जीवित करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना ही एक आनंदाची पर्वणी आहे.*

याआधी ग्राहकांना संपूर्ण थकीत रक्कम भरल्याशिवाय वीज जोडणी सुरू करून मिळत नव्हती किंवा नवीन वीज जोडणी दिली जात नव्हती.

परंतु या योजनेमुळे ग्राहकांना केवळ ३०% डॉऊन पेमेंट करून आपली वीज जोडणी पूर्ववत करून घेता येईल आणि उर्वरित रक्कम जास्तीत जास्त १२ सुलभ हफ्त्यांत भरता येईल. चालू वीज देयकाची रक्कम सुलभ हफ्त्यांत भरू इच्छिणाऱ्या ग्राहकांना *कुठल्याही प्रकारचे डाउनपेमेंट करावे लागणार नाही* आणि अशा ग्राहकांना जास्तीत जास्त ३ सुलभ हफ्त्यांत वीज देयकाची रक्कम भरता येईल.

वीज पुरवठा खंडित होऊन सहा महिन्यांच्या आत कालावधी झालेल्या ग्राहकांना जुनी वीज जोडणी डाऊन पेमेंट सोबत पुर्नजोडणी शुल्क भरून चालू करून मिळेल तर ६ महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटलेल्या ग्राहकांना नवीन वीज जोडणी करिता रीतसर अर्ज करता येईल.

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेले ग्राहक यांना वीज पुरवठा खंडित झाल्यापासून तर अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत जी *व्याजाची रक्कम होईल त्यामध्ये ५०% सवलत देण्यात आलेली आहे.* तसेच खटला दाखल असलेल्या ग्राहकांना विवादाची १००% रक्कम, कायदेशीर खर्चाची रक्कम तसेच खटला दाखल केल्याच्या तारखेपासून अर्जाला मंजुरी मिळण्यापर्यंतच्या व्याजात ५०% सवलत मिळणार आहे.

ग्राहकांना या योजनेचा विना विलंब लाभ घेता यावा याकरिता महावितरण तर्फे ऑनलाईन पोर्टलची व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ग्राहक थकीत देयकाची केवळ २% रक्कम भरून २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बिनशर्थ लिहून देऊन हफ्त्यांमध्ये वीज देयक भरण्याची सुविधा मिळविण्यासाठी अर्ज करू शकतो. ग्राहकाने अर्ज केल्यापासून जास्तीत जास्त ७ दिवसात त्यांच्या प्रकरणाला मंजुरी देण्यात येईल. मंजुरी मिळाल्यानंतर ग्राहकांना पुढील ७ दिवसात ३०% डाऊन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर पुर्नजोडणी शुल्क / नवीन वीज जोडणी शुल्क भरून वीज पुरवठा पूर्ववत करता येईल.

त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या देय तिथीवर चालू देयकाच्या रकमेसहित हफ्त्याची रक्कम भरावी लागेल.

जे ग्राहक दिलेल्या मुदतीत चालू देयकाच्या रकमेसोबत हफ्त्याची रक्कम भरणार नाही ते या सुविधेपासून वंचित होतील व त्यांची पूर्ववत केलेला वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात येईल.

चालू देयकाची रक्कम हफ्त्यात भरू इच्छिणाऱ्या ग्राहकांना या सवलतीचा फायदा प्रत्येक आर्थिक वर्षात एकदा तर मागील देयकाची थकीत रक्कम असलेल्या ग्राहकांना आर्थिक वर्ष २०-२१ पर्यंतच ही सवलत मर्यादित आहे.

(अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क

दिनचर्या न्युज
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment