Ads

चंद्रपूर परिमंडलातील एकूण ७९ हजार ३०४ कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची सुवर्णसंधी
चंद्रपूर परिमंडलातील एकूण ७९ हजार ३०४ कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची सुवर्णसंधी

कृषिपंपधारक वीजबिल भरुन थकबाकीमुक्त होणार सोबतच

गावाच्या व जिल्हयाच्या प्रगतीचे भागीदारही होणार

दिनचर्या न्युज

चंद्रपूर
दिनांक १७ फेब्रुवारी २०२१

राज्यात प्रथमच कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले. कृषिपंपधारकांना वीजबिलात सवलत देण्याच्या योजनेतून

चंद्रपूर परिमंडलातील एकूण ७९ हजार ३०४ ग्राहकांना त्यांच्या २३२ कोटीच्या वीजबिल थकबाकीवर १८ कोटीची ६७ लाखाची सूट व सोबतच २१ केाटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हएाजे एकत्रितपणे ४० कोटी माफ होवून १९२ कोटी अशी सुधारीत थकबाकी निर्धारीत करण्यात आली आहे. या सुधारीत थकबाकीपैकी प्रथमर्षी या योजनेचा लाभ घेतल्यास निम्मिच रक्कम म्हणजे ९६ कोटीच कृषिग्राहकांनी भरायचे आहेत. एकत्रिपणे घसघशीत १३६ कोटी हे कृषिग्राहकांचे माफ होणार असून थकबाकीमुक्तिची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. सोबतच त्यांना त्यांच्या गावाच्या व जिल्हयाच्या विकासाची संधी मिळाली आहे.

चंद्रपूर मंडलातील ५७ हजार ९०० ग्राहकांना त्यांच्या १६४ कोटीच्या वीजबिल थकबाकीवर १४ कोटी ४२ लाखाची सूट व सोबतच १५ केाटी विलंब आकार व व्याज माफ होवून १३४ कोटी ७६ लाखाची अशी सुधारीत थकबाकी निर्धारीत करण्यात आली आहे. या सुधारीत थकबाकीपैकी प्रथमर्षी या योजनेचा लाभ घेतल्यास निम्मिच रक्कम म्हणजे ६७ कोटीच कृषिग्राहकांनी भरायचे आहेत. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत प्रथमवर्षी वीजबिल भरल्यास त्यांचे वीजबिल कोरे तर हेाणार आहेच परंतु कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या या वीजबिलाच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे २२ कोटी १४ लाख हे शेतकरी बांधवांच्या गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तसेच ३३ टक्के म्हणजे २२ कोटी १४ लाख हे कृषिग्राहकांच्या जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध कृषिग्राहकांनी वीजबिल भरल्यास उपलब्ध होणार आहेत. या मुलभूत सुविधांमध्ये नवीन वीजउपकेंद्रे, नवीन रोहित्रे, नवीन वीजवाहिण्या, निरनिराळी दुरुस्ती कामे, खराब झालेली वीजखांबे बदलून त्याजागी नवीन वीजखांब उभारणे अशा अनेक कामांतून कृषिपंपधारकांच्या गावाच्या व त्यांच्या जिल्हयाच्या व स्वतः कृषिग्राहकांचा विकास साधल्या जाणार आहे.


गडचिरेाली मंडलातील २१हजार ४०० ग्राहकांना त्यांच्या ६७ कोटी ७२ लाखाच्या वीजबिल थकबाकीवर ४ कोटी २५ लाखाची सूट व सोबतच ६ केाटी ३३ लाखाचा विलंब आकार व व्याज माफ होवून ५७ कोटी १३ अशी सुधारीत थकबाकी निर्धारीत करण्यात आली आहे. या सुधारीत थकबाकीपैकी निम्मिच रक्कम म्हणजे २८ कोटी ५७ लाखच कृषिग्राहकांनी भरायचे आहेत. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत प्रथमवर्षी वीजबिल भरल्यास त्यांचे वीजबिल कोरे तर हेाणार आहेच परंतु कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या या वीजबिलाच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे ९ कोटी ४३ लाख हे कृषिग्राहकांच्या गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तसेच ३३ टक्के म्हणजे ९ कोटी ४३ लाख हे कृषिग्राहकांच्या जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध शेतकरी बांधवांनी वीजबिल भरल्यास उपलब्ध होणार आहेत. या मुलभूत सुविधांमध्ये नवीन वीजउपकेंद्रे, नवीन रोहित्रे, नवीन वीजवाहिण्या, निरनिराळी दुरुस्ती कामे, खराब झालेली वीजखांबे बदलून त्याजागी नवीन वीजखांब उभारणे अशा अनेक कामातून कृषिग्राहकांनी गावाच्या व त्यांच्या जिल्हयाच्या व स्वतः कृषिग्राहकांचा विकास साधल्या जाणार आहे.

अशी आहे योजना

या योजनेनुसार कृषी पंप ग्राहकांनी प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास त्यांना (५० टक्के) अतिरिक्त सूट दुसऱ्या वर्षी भरल्यास ३०% अतिरिक्त सूट व तिसऱ्या वर्षी भरल्यास २०% अतिरिक्त सूट. थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना योजनेच्या कालावधीत चालू वीज बिलावर अतिरिक्त ५% सवलत.थकबाकी वसुली करणाऱ्यांसाठी नव्या धोरणात विविध प्रोत्साहनपर योजनांचा समावेश थकबाकी वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीला वीज बिल भरणा केंद्र म्हणून प्रती वीजबिल वसुलीसाठी रु.५/- ,थकबाकी वसूल केल्यास ग्रामपंचायतीला वसूल केलेला थकबाकीच्या ३०% रक्कम. चालू वीजबिल वसूल केल्यास ग्रामपंचायतीला वसुली रकमेच्या २०% मोबदला.

गाव पातळीवर सहकारी संस्था, महिला बचत गट, “महिलांचा स्वयं सहाय्यता गट” इत्यादींची “वीज देयक संकलक एजन्सी” म्हणून नेमणूक व त्यांनादेखील वरील प्रोत्साहन थकबाकीची रक्कम वसूल केल्यास शेतकरी सहकारी संस्थाना वसूल केलेल्या रक्कमेच्या १०टक्के रक्कम प्रोत्साहनपर मिळणार आहे ग्राहकाने भरणा केलेल्या रकमेपैकी ३३% रक्कम ग्राहकाच्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी प्राप्त होणार असून ग्राहकाच्या भरणा रकमेपैकी आणखी ३३% रक्कम ही ग्राहकाच्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे

कृषिपंपधारकांना नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना ऑनलाईनद्वारे मराठीमध्ये अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर या वेबपोर्टलची लिंक देण्यात आली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment