धक्कादायक :- चंद्रपूर, जुनोना परिसरात 26 वर्षीय युवकाचा खुन. शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण...!
चंद्रपूर शहरात पुन्हा 26 वर्षीय युवकाचा खून.
आरोपींनी धारदार शस्त्रांनी युवकांवर हल्ला करून केले ठार, आरोपी फरार.
चंद्रपूर न्यूज नेटवर्क :-
जिल्ह्यात खून करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संघटित गुन्हेगारीतून।कट रचून खून करण्याचे सत्र सुरूच आहे काही महिन्यापूर्वी सूरज बहुरीया व राजू यादव यांचा बंदुकीने खून यार शुभम फुटाणे याचा धारदार शस्त्राने खून झाल्यानंतर आता चंद्रपूर शहरातील जूनोना रस्त्यावरील विकतूबाबा मठाजवळ 26 वर्षीय सोनू चांदेकर नामक युवकाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीवर आळा कसा बसेल? यावर पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा चंद्रपूर जिल्हा बिहार राज्यातील गुंडगिरीचा जिल्हा बनेल.
ही घटना 2 मार्चला रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान घडली असून अचानक अज्ञातांनी सोनु चांदेकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत ठार केले आणि आरोपींनी घटनास्थळावरून lपळ काढला, दरम्यान घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशन ठाणेदार रोशन यादव आपल्या चमुसह घटनास्थळी पोहचले. सोनू च्या हत्येमागचं कारण काय? आरोपी कोण? याबाबत रामनगर पोलीस तपास करीत आहे.
0 comments:
Post a Comment