Ads

सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होणारच - मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार
सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होणारच - मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार

अवैध होर्डींग संबंधी आढावा बैठक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर १६ मार्च - शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर शंभर टक्के कारवाई होणार असुन मनपातर्फे यास सुरवात झालेली आहे. काही ठिकाणी उंचावर असलेल्या तसेच मजबूत ढाचा असलेल्या होर्डींग्स काढण्यास एजन्सीची नियुक्ती करणार असल्याचे मा.महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी १६ मार्च रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत सांगितले.
शहरात अनेक होर्डिंग, बॅनर हे अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून या करीता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही अश्या होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील अनधिकृत हार्डिंग्जवर गंभीरतेने चर्चा करण्यात आली. शहरात विविध जागी डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर लागलेले आहेत. यातील अनेक होर्डिंग, बॅनर हे अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून या करीता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही.
महानगरपालिका हद्दीत अश्या स्वरूपाचे डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर उभारतांना मनपाकडून रीतसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते, मात्र यातील अनेकांनी टॅक्स सुद्धा भरलेला नाही तसेच बऱ्याच ठिकाणी मनपाकडून परवानगीही घेण्यात आलेली नाही. अश्या अनधिकृत बॅनर, होर्डिंग्सची मुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतच आहे शिवाय मनपाचे आर्थिक नुकसानही होत आहे. काही ठिकाणी धोकादायक इमारतींवर होर्डिंग्ज आहेत
 यापुर्वी नगररचना विभागातर्फे अश्या अवैध होर्डिंगचा सर्व्हे करण्यात आला होता. पाहणी केल्यानंतर संबंधितांना धारकांना नोटीस बजावण्यात आल्या, मात्र त्यानंतरही होर्डिंगधारकांनी दुर्लक्ष केल्याने आता मनपातर्फे कडक कारवाई केल्या जात आहे
    याप्रसंगी उपायुक्त श्री. अशोक गरोटे, श्री. विशाल वाघ, सहायक आयुक्त. श्री. धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, सौरभ गौतम, प्रतीक देवतळे, राहुल भोयर, सुरेश माळवे, राहुल पंचबुद्धे उपस्थित होते.              
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment