Ads

दिलासादायक : तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात मृत्यु शुन्यावर तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी 24 तासात 13 कोरोनामुक्त, 11 पॉझिटिव्ह





दिलासादायक : तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात मृत्यु शुन्यावर तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी
24 तासात 13 कोरोनामुक्त, 11 पॉझिटिव्ह

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर,दि. 6 जुलै : गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्युची संख्या शुन्यावर आली असून ॲक्टीव्ह रुग्णसंख्यासुध्दा प्रचंड कमी झाली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 11 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 11 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1 , चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 3, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 2, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 750 वर पोहोचली आहे.

तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 49 झाली आहे. सध्या 169 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 70 हजार 876 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 83 हजार 156 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1532 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

*प्रशासनाचे आवाहन :* नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

दिनचर्या न्युज
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment