दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स काल झालेल्या गोळीबारातील समावेश असलेल्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
काल झालेल्या गोळीबारान
चंद्रपूर शहर हादरून गेले होते. हा गोळीबार जुन्या वैमनस्यातून झाला असून सुरज बहुरिया प्रकरणातील आरोपी असल्याचे चर्चिले जात आहे.
चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात आकाश उर्फ चिन्ना अंदेवार या युवकावर बुरखाधारी युवकाने अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आकाश हा गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाळे यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथून दोन युवकांना रात्रीच्या सुमारास अटक केली आहे. अंकुश वर्मा, अमित सोनकर अशी अटकेतील युवकांची नावे आहेत. विशेष म्हणजे, अटकेतील दोन्ही युवक सुरज बहुरिया टोळीचे सदस्य असल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वी बल्लारपूर येथे सुरज बहुरिया याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात सुरज बहुरिया याचा मृत्यू झाला. या प्रकरणात तब्बल १० युवकांना ताब्यात घेतले होते. यातील ५ युवकांना दोन महिन्यांपूर्वी जामीन मिळाला होता. त्यात कालच्या गोळीबारात जखमी झालेल्या आकाश चा समावेश होता.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment