मुंबई : विधानसभेतील गदारोळ प्रकरणी आज भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, अशिष शैलार, नारायण कुचे, पराग अळवणी, शिरीष पिंपळे, योगेश सागर, किर्तीकुमार भांगडिया या सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.ओबीसींच्या मागण्यासाठी हे बाराही आमदार सभागृह अध्यक्ष्यांचा दालनात जाऊन आक्रमकता केली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी दुपारी विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना दालनात धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नबाव मलिक यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, विरोधकांनी माईक खेचण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील लांच्छनास्पद घटना घडली आहे. मी ३६ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत च्या विधिमंडळात असा प्रकार पाहिला नाही.
सभागृहातील गोंधळानंतर विरोधक आणि सत्ताधारी एकत्र बसून तोडगा काढतात. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजपचे आमदार गावगुंडांसारखे माझ्या अंगावर आले. अश्लील शिवीगाळ केली. मात्र चुकीच्या पद्धतीने सदस्य वागले. मी कधीही व्यक्तिगत वैरभावाने वागलेलो नाही. आज विधानसभा अध्यक्ष म्हणून लोकशाहीला धरुनच मी माझी भूमिका मांडली. मात्र भाजपच्या सदस्यांचे वर्तन अत्यंत चुकीचे होते.भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये वादावादी झाली, असा खुलासा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांशी चर्चा करुनच पुढील कारवाई करा, असे आवाहनही त्यांनी केली. मात्र गदारोळ करणाऱ्या १२ आमदारांचे निलंबनाचा प्रस्ताव अनिल परब यांनी मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. या कारवाईचा निषेध करत भाजप सदस्यांनी सभागृहाचा त्याग केला.
दरम्यान, अधिवेशनात विविध प्रकरणं काढू या भितीनेच आमच्या आमदारांचे निलंबन करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment